Saturday, April 28, 2012

डोकी रिकामी करणारं ‘ई-जाल’



ऑनलाइन अँडिक्शनमुळे मन बिथरतंय आणि डोकी थंड पडू लागली आहेत !

खूप काम करतोय.
खूप तास करतोय.
पण कामात लक्षच लागत नाही.?
मनासारखं कामच होत नाही.?
गुणवत्ता घसरणीला लागली आहे..?
कामाचे तास वाढले तरी कामं संपतच 
नाहीत.?
का.?
विचारा स्वत:ला.
-तुम्ही दिवसभराचे किती तास इंटरनेटवर 
घालवता.?
-------**-------
नाही बसत तुम्ही घरी किंवा ऑफिसला
खुर्चीला चिकटून.?
नाही करत चॅटिंग.
पण मोबाईलवर नेट अँक्सेस आहे 
तुम्हाला.?
सतत वापरता टिटर 
हा काय म्हणाला आणि तो काय म्हणाला.
तुमच्या डोक्यात भिरभिरत राहतं
ते सारं.
आणि विसरूनच जाता तुम्ही
रोजची महत्त्वाची कामं.?
त्यावरून मग गिल्टी पण वाटतं तुम्हाला.?
-------**-------
आपण एक काम सुरू करतो.
मग त्यात काही मजाच वाटत नाही.
मग दुसरं सुरू करतो.
त्यातही काही मजा येत नाही.
एकही काम धड होत नाही.
एकावेळेस अनेक गोष्टी चालतात डोक्यात.
अनेक विचार.
विचारांची ट्रॅफिक जाम.
असं होतं कधी.?
पण मग तपासा
ही सारी कामं करताना
तुमच्या कॉम्प्युटरवर किती खिडक्या 
उघड्या असतात.?
-------**-------
-हे असं सारं होत असेल.?
तर नक्की ओळखा की, 
तुम्ही नेट डिस्ट्रॅक्शनचे बळी आहात.
तुम्हाला व्यसन लागलं असो नसो नेटचं.
पण त्यातून तुमचं मन बिथरलंय.
कामातलं लक्षच नाही, तर
कामच डोक्यातून उडवणारं हे बिथरलेपण 
आपणच थांबवायला हवं.
पण त्यासाठी जरा नेट मिनिमाईज करून, 
आयुष्याची खिडकी मॅक्सिमम उघडली 
पाहिजे.!
-------**-------
परीक्षा तोंडावर आल्या आहेत.
अभ्यास करू तेवढा कमी.
पुस्तकं समोर घेतलीही जातात.
पण मन लागत नाही.
अभ्यास करावासाच वाटत नाही.
कितीही समजावलं स्वत:ला
तरी चित्त अभ्यासात लागत नाही.
वाटतं, काहीतरी मिसिंग आहे.
असं होतं तुमचं.?
-विचारा स्वत:ला.
तुम्ही दिवसभराचे किती तास इंटरनेटवर 
घालवता.?
-------**-------
रविवारची एखादी संध्याकाळ.
एखाद्या मैफलीला गेला होतात तुम्ही.?
नाटकाला.?
सिनेमाला? 
एखाद्या भाषणाला.?
जुन्या मित्रांना भेटायला.?
एखाद्या लग्नाला, मुंजीला, बारश्याला.?
नाही.!
बोअर होतं हे सारं.
मग त्या वेळेत काय केलंत.
घरी बसून नेटवर टाइमपास.?
का असं होतं.?
आपण माणूसघाणे झाले आहोत का.?
-------**-------
बोअर होतं संध्याकाळी.
उदास.
लोक किती काय काय करतात
आणि आपलं आयुष्य अजिबात हॅपनिंग 
नाही
असं वाटतं.
डोकं जड होतं.
अंग दुखतं असं वाटतं.?
मग तपासा, दिवसभरात काहीच घडलं 
नाही किंवा केलं नाही आपण काम.
नुस्तं सर्फिंगच केलं.?


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive